• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक

समाजमाध्यमांवरील व्हिडिओच्या तांत्रिक पुराव्यांची पोलिसांकडून पडताळणी; दोन अल्पवयीनांवरही कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक

भुसावळ, (प्रतिनिधी) : चार महिन्यांपूर्वी १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. समाजमाध्यमांवर अलीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तसेच पीडिताच्या आईने दिलेल्या पुरवणी जबाबानंतर मूळ गुन्ह्यात चार वाढीव कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.

२३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी २४ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला BNS कलम ११८(१), ११५(२), ३२४(४) व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली होती. मात्र, घटनेशी संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची तांत्रिक तपासणी केली. त्यासोबतच फिर्यादीच्या आईचा पुरवणी जबाब नोंदविण्यात आला. त्यानुसार मूळ गुन्ह्यात BNS कलम १४०(१), १२७(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(E) व ६७ समाविष्ट करण्यात आले.

प्रकरणात अपेक्षित कारवाई होत नसल्याने पीडित तरुणाच्या आईने १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचे दिसून आले. पोलिसांनी सिद्धेश महाडीक (१९) आणि सागर साळुंखे (१९) यांना अटक केली आहे. प्रकरणातील १७ वर्षे ११ महिन्यांचा मुख्य संशयित यापूर्वीच बाल सुधारगृहात हजर करण्यात आला आहे. अन्य १७ वर्षीय बालकाला आज बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.


 

Next Post
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add