• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभेचे माजी आमदार आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय ‘सामाजिक पुरस्कार’ माजी आयकर सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांना, तर ‘राजकीय (पुरोगामी) पुरस्कार’ मिरा-भाईंदर मनपाचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ ऑगस्ट रोजी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा दोन दिवसीय सोहळा पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किरण पाटील, महेंद्र रामोशे आणि बापूराव ठाकरे उपस्थित होते.

​पुरस्कार वितरण सोहळा २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. लाल टोपी, बागायतदार रुमाल, रु. २१,००० रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

​तसेच या कार्यक्रमाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत ‘मानवी बुद्धीला आव्हान: समजदारीचे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे?’, ‘लोकशाहीचा वेध : प्रश्न विचारण्याची शक्ती की शांततेची सक्ती?’ यांसारख्या विविध वैचारिक विषयांचा समावेश आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. ११,०००, रु. ९,००० व रु. ७,००० आणि रु. २,००० ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. प्रा. राजेंद्र देशमुख, बी. एन. चौधरी व प्रा. रमेश माने हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या वैचारिक सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Next Post
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add