• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2026
in Uncategorized
0
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : मन्यारखेडा येथील तलावातील मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे पालन करूनही स्थानिक १६ उद्योजकांना प्रशासनाकडून जाणूनबुजून वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप उद्योजकांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे परिसरातील तीन उद्योग बंद पडल्याची खळबळजनक माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योजकांनी आपली व्यथा मांडली.

​मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर मासे दगावल्याची घटना घडल्यानंतर, स्थानिक मत्स्य उत्पादकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) १६ उद्योजकांना सुनावणीची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आपण नियमानुसार उद्योग चालवत असतानाही आपल्याला विनाकारण लक्ष्य केले जात असून प्रशासकीय जाचाला कंटाळून तीन उद्योजकांनी आपले उद्योग बंद केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मासे दगावल्याचे मूळ कारणाचा देखील शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

​पत्रकार परिषदेस रवींद्र फालक, मधुकर महाजन, संतोष इंगळे यांच्यासह दत्तू मराठे, रमेश सोनार, कैलास पाटील, सतीलाल पाटील, संदीप वाघ, चंद्रकांत कोल्हे आणि संतोष कोळी आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रशासनाने उद्योजकांना विनाकारण वेठीस धरणे थांबवावे,” अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add