• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 4, 2026
in शैक्षणिक
0
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

​धरणगाव, (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. विद्यार्थी वर्ग सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये अधिक व्यस्त असल्याने त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात विशेष सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे व साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, डेटा चोरी, बनावट सोशल मीडिया खाती, फेक लिंक, ऑनलाइन गेमिंगमधील फ्रॉड आणि मोबाईल ॲप्स वापरताना होणाऱ्या धोक्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

​कार्यक्रमादरम्यान हॅकरचा मुखवटा वापरून दाखवण्यात आलेले विशेष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या प्रात्यक्षिकातून हॅकर्स वैयक्तिक माहिती कशी मिळवतात, फसवणूक कशी करतात आणि आर्थिक नुकसान कसे पोहोचवतात, याचे वास्तव प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट झाले.

याशिवाय खेळ, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


 

Next Post
उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना 'साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार' जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add