• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या पुढाकाराने धरणगाव तालुक्यातील वंजारी या गावात ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केले. बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा, करंज सारख्या स्थानिक प्रजातींची झाडांच्या रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरासह सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
शाळेचा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पुढील पिढीमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, जैन फार्म फ्रेश फूडचे कृषीसेवक योगेश महाले यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी मनीषा साळुंखे, ग्रामपंचायत सरपंच वंदना पाटील, सदस्य नामदेव साळवे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश चौधरी, प्रल्हाद साळवे, किरण लोखंडे, विजय महाजन, ग्रामस्थ तसेच कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, मुख्याध्यापक भिकन पाटील, संदेश शिरसाठ, पी. एस. पाटील, एस. आर. पाटील, राजेश पावरा, किरण पाटील, शुभांगी पाटील, एम. डी. अहिरे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला.

लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी शाळा, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ संयुक्तपणे सांभाळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


 

Next Post
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले 'हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव'

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add