• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

महादेव हॉस्पिटलमध्ये मासिक ओपीडीचा प्रारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 10, 2026
in आरोग्य
0
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या जळगावकर रुग्णांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. देशातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार (एम.डी., डी.एन.बी. कार्डिओलॉजी) यांची नियमित मासिक ओपीडी आता जळगावात सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आकाशवाणी चौक, विद्यानगर येथील ‘महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही ओपीडी होणार असून, या महिन्यातील विशेष तपासणी व उपचार शिबिर शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

​डॉ. महेंद्रसिंह परिहार हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच बालकांमधील जन्मजात हृदयरोगाचे तज्ज्ञ असून, हृदयविकाराच्या आधुनिक उपचारांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य प्राप्त आहे. या विशेष ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, हार्ट अटॅकची शंका, वारंवार खोकला किंवा थकवा येणे, हृदयाचे ठोके अनियमित किंवा वेगाने पडणे, घबराट होणे, दम लागणे, हात-पायांवर सूज येणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा विविध हृदयविकाराशी संबंधित तक्रारींवर अचूक निदान व उपचार केले जाणार आहेत.

​बालकांमधील जन्मजात हृदयरोगांवर विशेष लक्ष..
या शिबिरात प्रौढांसोबतच बालकांमधील जन्मजात हृदयरोगांचे निदान करण्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे. लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला किंवा न्यूमोनिया होणे, दूध पिताना कपाळावर घाम येणे, अपेक्षेप्रमाणे वजन न वाढणे, रडताना किंवा खेळताना दम लागणे, मूल निळे पडणे, सतत चिडचिड करणे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.

​दरम्यान, महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अ‍ॅडल्ट व पेडियाट्रिक २ डी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, होल्टर मॉनिटरिंग, कोरोनरी व पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसविणे, डिव्हाईस क्लोजर, बलून व्हॉल्व्होटॉमी तसेच बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी अशा सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हृदयविकाराच्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Next Post
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add