• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 10, 2026
in महाराष्ट्र, राजकीय
0
महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

जालना, (विशेष प्रतिनिधी) : जालना शहर महानगर पालिकेत लुडबुड करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांना आयुक्त अंजली शर्मा यांनी चांगलाच चाप बसविला आहे. नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या अधिकृत लोकप्रतिनिधी यांनीच महानगर पालिकेत वावर ठेवावा. त्यांचे पती, पत्नी भाऊ किंवा इतर नातेवाईक यांनी कामात हस्तक्षेप करू नये असे परिपत्रक शरम यांनी गुरुवारी काढले.

काय आहे परिपत्रकात?

जालना महानगरपालिका क्षेत्रामधून लोकप्रतिनिधी म्हणून केवळ निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविका यांनाच महापालिकेच्या कामकाजात भाग घेण्याचा आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मत मांडण्याचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु असे निदर्शनास आले आहे की, काही लोकप्रतिनिधीचे नातेवाईक जसे की पती, पत्नी, वडील, मुले. भाऊ महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये आणि विकासकामांच्या ठिकाणी वावरत असून कामांत हस्तक्षेप करीत आहेत.

अशा व्यक्तींकडून स्वतः नगरसेवक असल्याचे भासवणे, तसा Social Media वर व इतर सामाजिक माध्यमांवर उल्लेख किंवा वावर करणे, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना नगरसेवक म्हणून फोन करणे व कार्यालयांना नगरसेवक अधिकारात भेटी देण्याचा प्रयत्न करणे, खाजगी कार्यालयीन ठिकाणी नगरसेवक म्हणून उल्लेख ठेवणे ई. बाबी निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. सदर बाबी गंभीर स्वरूपाच्या असून महानगरपालिकेच्या बदनामीस व कारवाईस पात्र आहेत.

त्यानुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी नगरसेवक व नगरसेविकांना व सन्मानाची वागणूक द्यावी. मात्र त्यांच्या नातेवाईकास दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करू देऊ नये, त्यांचे कोणतेही आदेश पाळू नयेत. तसेच त्यांच्या दबावास बळी पडून कायद्यास व नियमास अनुज्ञेय नसलेली कामे करू नयेत. तथापि अशा व्यक्ती नागरिक म्हणून आल्यास त्यांची कार्यालयीन कामे नियमानुसार करावीत.

सर्व सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका, जालना महानगरपालिका यांना विनंती करण्यात येते की, आपण आपले नातेवाईक जसे की पती, पत्नी, भाऊ, वडील, मुले यांना उपरोक्त कार्यालयीन परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे, जेणेकरून कार्यालयीन शिस्तीचा भंग होणार नाही व त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रतिमेस हानी पोहोचणार नाही.

दरम्यान, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांतून स्वागत केलं जात आहे.

Tags: #jalana
Next Post
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

ताज्या बातम्या

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव
गुन्हे

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add