• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 10, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

​भुसावळ, (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईत एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या एकूण ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने भुसावळ शहरासह जामनेर आणि अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

विशाल राजेंद्र राठोड (वय ४६ वर्षे, रा. भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ​२३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेडमधून विजय जगन्नाथ खडके यांची १५,००० रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. MH-19-EK-2350) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली.

​दरम्यान, भुसावळ शहर पोलिसांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने सापळा रचून संशयित विशाल राठोड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्यासह इतर ५ अशा एकूण ६ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

​ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार अब्दुल रज्जाक खान, सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांनी केली आहे.

Tags: BhusawalCrimeJalgaonPolice
Next Post
महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची "लुडबूड" आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

ताज्या बातम्या

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक
महाराष्ट्र

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

July 10, 2026
भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश
गुन्हे

भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

July 10, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group