• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2026
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज अंतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी (२०२५-२६) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या निकालात एआय आणि डेटा सायन्स अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी चेतन दिनेश चौधरी याने ९.६१ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ईलेक्ट्रीकल शाखेची विद्यार्थिनी अंकिता संजय घाटे हिने ९.३२ सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांकावर तीन विद्यार्थ्यांनी समान गुणांसह यश मिळविले आहे.

यामध्ये संगणक शाखेचा गौरव रामा इंगळे, संगणक शाखेची अल्फिया नाज शोएब खातीक तसेच ईलेक्ट्रीकल शाखेची युक्ता भानुदास तळेले या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९.३० सीजीपीए गुण प्राप्त करून संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल शाखेच्या गुणवंत अंकिता संजय घाटे हिने ९.३२ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. युक्ता भानुदास तळेले हिने ९.३० सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला, तर राजश्री अनिल यादव हिने ९.११ सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.

ई अँल्ड टीसी शाखेच्या गुणवंत मैती अंतरा संजय हिने ८.९८ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. भूमिका लक्ष्मण भंगाळे आणि अचल सत्यजित नर्खेडे यांनी प्रत्येकी ८.६१ सीजीपीए गुण मिळवत संयुक्त द्वितीय क्रमांक मिळविला. तर जान्हवी उमाकांत बारजीभे हिने ८.५७ सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला.

मेकॅनिकल शाखेच्या गुणवंत श्वेजल संजय परासे हिने ८.१४ सीजीपीए गुणमिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जान्हवी लक्ष्मीकांत राजपूत हिने ७.४३ सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तर संकेत दिलीप बागड याने ७.२० सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स निकालानुसार चेतन दिनेश चौधरी याने ९.६१ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. खुशबू धनराज नाले हिने ९.०७ सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तर भैरवी मनीष कुरकुरे हिने ८.९३ सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकमध्ये आधुनिक शिक्षणसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळाले असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.


 

Next Post
अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add