• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरीत दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया

न्यूरोसर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, एन्डोक्रोनॉलॉजी तज्ञांचे टिमवर्क

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
गोदावरीत दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया

जळगाव, दि. 09 – मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, एन्डोक्रोनॉलॉजी तज्ञांच्या सहकार्याने पिच्युटरी ग्रंथीतील ट्यूमवर यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.

शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्रौढावस्थेतील रुग्णाला अनेक दिवसांपासून डोके दुखण्याची समस्या होती. अचानक त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी बंद झाली, पापणीही पडल्याने नातेवाईक घाबरले, औरंगाबादपर्यंत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यानंतर जळगाव येथील न्यूरोजसर्जन डॉ.स्वप्नील पाटील यांना रुग्णासह नातेवाईक भेटले, रुग्णाची समस्या लक्षात घेवून एमआरआयचा रिपोर्ट पाहिला असता रुग्णाला मेंदूच्या पायथ्याशी ट्यूमर आणि सभोवताली रक्‍तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

याप्रसंगी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, एन्डोक्रोनॉलॉजी डॉ. चिमु चोपडे यांच्याशी न्यूरोलॉजिस्ट डॉ.स्वप्नील पाटील यांनी चर्चा केली. चर्चेअंती डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.विक्रांत वझे, डॉ.चिमु चोपडे यांनी पिच्यूटरी ग्रंथीची गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया भुलतज्ञ डॉ.शितल, डॉ.देवेंद्र यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
पिच्यूटरी ट्यूमर ही एक मोठी शस्त्रक्रिया असून त्यासाठी रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक येथे जातात मात्र ही सुविधा डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध आहे. कुठल्याहीप्रकारची चिरफाड न करता नाकावाटे आणि दुर्बिणीद्वारे ५ तासांच्या कालावधीत ही शस्त्रक्रिया झाली. यात मेंदूतील रक्‍तवाहिन्या फुटणे, मेंदूतुन पाणी गळणे, कोमात जाणे, डोळे पूर्णत: जाणे अशी रिस्क होती मात्र आम्हा तज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. – डॉ.स्वप्नील पाटील, न्यूरोसर्जन

टिमवर्कद्वारे रुग्णाची त्रासातून सुटका
शस्त्रक्रियेआधी आणि नंतरही रुग्णाची पेरिमेट्री चाचणी करण्यात आली, यातून दृष्टीपटलाची क्षमता आली, आम्ही टिमवर्कने शस्त्रक्रिया केली आणि त्याला यश आले. रुग्णाला दिसायला लागले, त्याचप्रमाणे पडलेली पापणीही काही अंशी वर जात आहे. एकाच छताखाली स्पेशालिस्ट डॉक्टरांची फळी असल्याने पिच्यूटरी ग्रंथीतील ट्यूमर पूर्णत: काढण्याची शस्त्रक्रिया झाली असून रुग्णाची त्रासातून सुटका झाली. – डॉ.विक्रांत वझे, कान-नाक-घसा तज्ञ


 

Next Post
लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया - पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add