• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे रामेश्वर काॕलनी परिसरात वृक्षारोपण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

जळगाव, दि. 9 – शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड जागेवर वृक्षारोपण केले जावे. जेणे करून हरित शहर होण्यास मदत होईल, असे सांगत रामेश्वर काॕलनीतील नागरिकांचा उत्स्फूर्त लोकसहभागाचे कौतुक पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केले व लोकसहभागातुन शहराला हरित शहर करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रामेश्वर काॕलनीमधील जलकुंभच्या खुल्या भुखंडावर वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्याने आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे होत असलेल्या वृक्षारोपण सृजनशिल उपक्रमाप्रसंगी जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य प्रो. सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह परिसरातील दिपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दिपक संनसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमित देशमुख यांच्यासह रहिवासी उपस्थितीत होते.

मान्यवरांसह नागरिकांनी मिळुन 250 देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली. यामध्ये बेहडा, करंज, पिंपळ, बुच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफाॕर्म, बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ, पिंपळ बेंड, स्पॕथोलिया, गुलमोहर, सुरू, विलायती चिंच यांचा समावेश आहे. यावेळी विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिन त्यागी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावुन सांगितले. ॲड. जमील देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली.

तसेच उपक्रमाबातची संकल्पना समजून सांगितली शहरातील आणखी खुल्या भुखंडावर वृक्षारोपण करायचे असल्यास गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठानशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक, जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी, मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.


 

Next Post
शास्त्रीय उप-शास्त्रीय गायनासह कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

शास्त्रीय उप-शास्त्रीय गायनासह कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

ताज्या बातम्या

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 26, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add