• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव, (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच “कॉपीमुक्त अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या परीक्षेसाठी जळगाव शहरात ३० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार, दि. २८ जून २०२६ रोजी पेपर सुरू झाल्यापासून ते पेपर समाप्त होईपर्यंत (सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००) जळगाव शहरातील सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हा आदेश परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांना लागू राहणार नाही. तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने संबंधित कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार एकतर्फी स्वरूपात निर्गमित करण्यात आला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी कळविले आहे.


 

Next Post
पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add