• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी

जळगाव, (प्रतिनिधी) : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. असे असतानाही मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेली आक्षेपार्ह व अवमानकारक भाषा अत्यंत निषेधार्ह आहे, अशी तीव्र भूमिका ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेने’ घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जळगावात प्रशासनाला निवेदन देऊन खासदारांवर कठोर कारवाईची आणि त्यांच्या जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे.

२५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, यामुळे पत्रकारांचा अपमान झाला आहे. हे कृत्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांना थेट बाधा पोहोचवणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित खासदारांवर कायदेशीर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून करण्यात आली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, संस्थापक खजिनदार ललित खरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव शहर अध्यक्ष जितेंद्र कोतवाल, पत्रकार मनिष जोग, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, योगेश सुने, पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संधिपाल वानखेडे, निखिल वाणी, विकास पाथरे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहसिंग ठाकुर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #reporter#खा.संजयदिनापाटीलmumbaiShivsena

ताज्या बातम्या

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी
जळगाव जिल्हा

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या खासदार संजय पाटलांचा जळगावात निषेध; जाहीर माफीची मागणी

June 25, 2026
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

June 25, 2026
एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात
आरोग्य

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

June 25, 2026
जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार
क्रिडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
जळगाव जिल्हा

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

June 25, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group