• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा, आपुलकीची आवश्यकता : प्रा. कट्यारे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा बैठकीत 'वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा' अभियानाचा संकल्प, पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांचा सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा, आपुलकीची आवश्यकता : प्रा. कट्यारे

जळगाव, (प्रतिनिधी) : परिस्थितीशी हतबल, अगतिक झालेला व्यक्ती भरकटून बुवा बाबांच्या दरबारी बसतो आणि त्याचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते. त्यामुळे अंधश्रद्धेत फसलेल्या व्यक्तीला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याची महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा’ आणि ‘लर्निंग फेलोशिप’ अंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.

या बैठकीला निरीक्षक म्हणून अंनिसचे राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. त्यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा सविस्तर वृत्तांत मांडला. मंचावर राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, सुनील वाघमोडे आणि शहर अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विविध शाखांनी आपला प्रगती अहवाल मांडून मागील चार महिन्यांत केलेल्या समाजप्रबोधनाच्या कामांची माहिती दिली. अहिल्यानगर येथील राज्य बैठकीत जळगाव जिल्ह्यातील संस्था व कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या बैठकीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिकच्या खरात प्रकरणानंतर राज्यभरामध्ये गेल्या चार महिन्यात ७० बुवाबाबांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

उत्कृष्ट शाखा पुरस्कार: जामनेर व अमळनेर शाखा आणि लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जळगाव शहर कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी, जामनेरचे तीर्थराज सुरवाडे आणि अमळनेरचे डॉ. दिनेश पाटील यांना मिळाला आहे. “अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आजही समाजासाठी किती आवश्यक आहे,” यावर शहर अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर राज्य पदाधिकारी प्रा. दिगंबर कट्यारे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा’ आणि ‘लर्निंग फेलोशिप’ या उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.

येत्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा- महाविद्यालयांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांमध्ये विवेकवाद रुजवला जाईल, अशी माहिती प्रधान सचिव रविंद्र चौधरी यांनी दिली. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी शहर शाखा कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

ताज्या बातम्या

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add