• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 12, 2026
in गुन्हे
0
पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पारोळा परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या रसायनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ लगत म्हसवे शिवारात टाकलेल्या या छाप्यात एकूण ९ लाख ३२ हजार १२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवे शिवारातील रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेलच्या पाठीमागे दिनेश पोपटराव पाटील (वय ४३, रा. पारोळा) हा इसम ‘सोडियम बाय सल्फेट’ या रसायनाचा बेकायदेशीर साठा करून तो काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने बाळगत होता. हे रसायन मानवी जीवनाला व मालमत्तेला धोकादायक ठरेल अशा असुरक्षित पद्धतीने साठवले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकाने सोमवारी, ११ मे रोजी या ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
​४.५० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा १२ चाकी टँकर.
​सुमारे ३३,७५० लिटर रासायनिक द्रव (किंमत अंदाजे ४.४२ लाख रुपये).
​७ प्लॅस्टिक टाक्या, जमिनीवरील जुना टँकर आणि १५ लहान टाक्या.
​एक मोटारसायकल, विवो कंपनीचा मोबाईल आणि १ HP ची मोटार.

या प्रकरणी आरोपी दिनेश पाटील याच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि योगेश महाजन करत आहेत.

Next Post
मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

May 12, 2026
पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 12, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

May 12, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन
क्रिडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
क्रिडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group