• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 26, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर रंगणार आहे. अमळनेर सुहांस जायंटस व जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी टक्कर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता हा थरारक सामना कोण जिंकणार व विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्वालिफायर च्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत झाले. जामनेर सातपुडा हिरोज चे कर्णधार शतायु कुलकर्णी यांने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रद्युम्न महाजनची संयमी खेळी आणि राम राठोडची फटकेबाजी यामुळे जामनेर सातपुडा हिरोजच्या डावाला आकार दिला. जामनेर सातपुडा हिरोज संघाने निर्धारित २० षटकांत १६० धावांचा टप्पा ओलांडत प्रतिस्पर्धी संघासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले होते.

सलामीवीर मानस विजय पाटील १० धावांवर बाद झाल्यानंतर, राम राठोडने आक्रमक पवित्रा घेत २८ चेंडूत ४३ धावा काढल्यात. यात त्याने ४ चौकार, ३ उत्तुंग षटकार खेचले. मात्र, एका बाजूने विकेट्स पडताना प्रद्युम्न महाजनने खिंड लढवली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. क्रिषी नथानीने ३३ धावांचे योगदान देत त्याला उत्तम साथ दिली. जामनेरचा डाव ५ बाद १६० धावांवर स्थिरावला.

इम्पॅक्ट प्लेयर सागर भावसार याने ४ षटकांमध्ये ३१ धावा देत २ गडी बाद केले. तर मनिष चौहाण याने ४ षटकांत फक्त २५ धावा देत २ गडी बाद केले. आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग्ज च्या सलामीची फळी अवघ्या १२ धावांवर असताना फुटली पहिला गडी अर्शद खान ने जितेंद्र नाईकच्या रूपाने घेतला. स्पर्धेत ऐन भरात असलेल्या ओम भोसलेने फटकेबाजीला सुरवात केली. मात्र त्याला नितालेश चौधरी ने विकेट देण्यास भाग पाडले. १७ चेंडू ३२ धावांवर यात ३ चौकार २ षटकार लगावत ओम भोसले आऊट झाला.

यानंतर जगदीश झोपे यांनी कर्णधाराची साजेशी खेळी केली. २५ चेंडूमध्ये ५ चौकार व ४ षटकार यांच्या मदतीने त्याने ६१ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. जळगाव कोगटा किंग्ज ने ५ गडी राखून अवघ्या १७ व्या षटकांत सामना आपल्या बाजूने केला. जगदीश झोपे सामनावीर म्हणून सन्मानीत करण्यात आले. निखेलेश चौधरी याला ११ निर्धार चेंडू टाकल्याने तर जगदीश झोपे याला सर्वाधिक ४ षटकार लगावल्याने सन्मानीत करण्यात आले. पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरगिशनचे मानव संसाधन विभागचे वरिष्ठ सहकारी व्ही. एम. भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 

Tags: #criket#sportsJalgaon

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
क्रिडा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026
लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात
जळगाव जिल्हा

लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात

April 25, 2026
जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’

April 25, 2026
दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!
क्रिडा

JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

April 25, 2026
‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार
जळगाव जिल्हा

‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

April 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group