• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

​जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये ‘जागतिक पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमाचा प्रारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता शितल कुमार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना प्राचार्यांनी जीवनात पुस्तकांचे स्थान गुरूस्थानी असल्याचे सांगत वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.

​महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली. बदलत्या काळात पुस्तके हीच खरी सोबती असून, वैचारिक प्रगल्भतेसाठी वाचन किती आवश्यक आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले.

​शैक्षणिक वर्षात ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर करून जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केल्याबद्दल तृतीय वर्ष बी.एस्सी.ची विद्यार्थिनी दिशा जैन हिला पेन आणि पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


​​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एन.एस.एस. को-ऑर्डिनेटर प्रो. जयश्री कुलकर्णी, प्रो. हिमानी जमाले यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला.


 

Next Post
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add