जळगाव, दि. 04 – सावित्रीबाई फुले यांची जयंती सोमवारी डॉक्टर वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स जळगाव येथे NSS unit द्वारे साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सावित्रीबाई यांच्या फोटोला हार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी NSS स्वयंसेविका प्रांजल इसाई हिने उस्फुर्त भाषण केले.
ज्यावेळी समाजात स्त्री ला चुल आणी मूल, याशिवाय दुसरे जीवनच नव्हते. त्या काळात ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्वतः भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान सावित्री बाई फुले यांनी मिळविल. स्त्री शिक्षणासाठी अखंड कार्यरत फुले दाम्पत्या मुळेच आजची स्त्री आपल्याला शिकत असलेली दिसते, स्त्री शिक्षणासाठी त्यांच्या पुढील आव्हाने, त्यांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा अशा अनेक पैलूंचा परिचय करून देण्यात आला.
यावेळी प्राचार्या उज्वला मावळे, NSS प्रोग्राम ऑफिसर मनीषा नाले, कविता देशमुख, रेणुका सूर्यवंशी, कुमारी भुवनेश्वरी नाले आदी शिक्षकवर्ग आणि संपूर्ण NSS स्वयंसेवक उपस्थित होते.