• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

​जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील जिल्हे उष्णतेच्या बाबतीत संवेदनशील असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विविध विभागांना खबरदारी घेण्याचे व कडक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. ४५ अंशांवर तापमान असताना सलग काही दिवस उष्णतेची लाट राहिल्यास हा गंभीर इशारा दिला जातो, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

​वाढत्या तापमानामुळे मजुरांना भरदिवसा कडाक्याच्या उन्हात कामावर ठेवू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली असून, कामगारांना बळजबरीने वेठीस धरणाऱ्या आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि मनरेगाच्या कामांच्या वेळेत तातडीने बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शहरातील उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये पुरेसा जलसाठा व इतर उपाययोजना तातडीने उभारण्याचे आदेशही प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

Next Post
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add