• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव पंचायत समितीमध्ये खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदारांनी दिले.

​या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, ॲडिशनल बीडीओ योगिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

​महत्त्वाचे मुद्दे व निर्देश:
▪️​घरकुल योजना: अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यावर, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून हप्ते वितरित करावेत, असे कडक निर्देश देण्यात आले.
▪️​योजनांची अंमलबजावणी: समाजकल्याण, महिला व बालकल्याण, सेस फंड, वित्त आयोग आणि सिंचन विहीर यांसारख्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवावा. नागरिकांना कार्यालयाचे चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी विशेष मोहीम राबवावी.
▪️​महिला सक्षमीकरण: महिला बचत गटांना केवळ कागदोपत्री मर्यादित न ठेवता, त्यांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देऊन उद्योजक बनवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या.

​यावेळी बोलताना खासदार स्मिता वाघ यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या योजना वेळेत न पोहोचल्यास त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास आणि पायाभूत सुविधांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


 

Next Post
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार
जळगाव जिल्हा

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

November 23, 2026
जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील

November 23, 2026
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add