• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली. ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग- २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’ जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंटस, जामनेर ब्लास्टर, पाचोरा टायटन्स हे संघ ‘ऑक्शन’ मध्ये निश्चित झाले.

‘ऑक्शन’ मध्ये सहभागी झालेल्या संघ मालकांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला. या पर्वात जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे, हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून त्यांची बोली लावली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

संघ व मालकांची माहिती

जळगाव किंग्स- फ्रँचायझी मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा
प्रशिक्षक : घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे

चाळीसगाव चार्जर्स- फ्रँचायझी मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब
प्रशिक्षक : सचिन सोनवणे
आयकॉन खेळाडू : ओम मुंडे

रावेर रॉयल्स- फ्रँचायझी मालक : सीए महावीर जैन
प्रशिक्षक : तनवीर अहमद
आयकॉन खेळाडू : नचिकेत ठाकूर

अमळनेर जायंट्स- फ्रँचायझी मालक : सुहांस केमिकल्स, संदीप काबरा
प्रशिक्षक : राहुल निंभोरे
आयकॉन खेळाडू : शुभम शर्मा

पाचोरा टायटन्स- फ्रँचायझी मालक : एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी
प्रशिक्षक : पंकज महाजन
आयकॉन खेळाडू : सचिन चौधरी

जामनेर ब्लास्टर्स- फ्रँचायझी मालक : रमेशदादा जैन
प्रशिक्षक : मुश्ताक अली
आयकॉन खेळाडू : शतायू कुलकर्णी

 


 

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

ताज्या बातम्या

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार
जळगाव जिल्हा

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

November 23, 2026
जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील

November 23, 2026
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add