• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

​जळगाव, (प्रतिनिधी) : प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री यांच्याहस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

​भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रशासनात ‘Ease of Living’ आणि ‘Ease of Working’ ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्ह्याने ई-ऑफीसचा १००% वापर, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांसारख्या ७ प्रमुख निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केली.

​या सोहळ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव प्रशासनाने केलेल्या कामाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ असून, ते सर्व जळगावकरांना समर्पित आहे,” अशी भावना व्यक्त केली. या यशामुळे डिजिटल क्रांतीच्या दिशेने जळगाव जिल्ह्याचा गौरव राज्यस्तरावर उंचावला आहे.
​


 

Next Post
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add