• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 14, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे येथील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील हुजेफ युनूस पिंजारी (वय १९) याने जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ त्याने एका खासगी क्लासचे स्वच्छतागृह आणि शहरातील एका हॉटेलच्या रूममध्ये तयार केले होते. ​नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. संशयित आरोपी हुजेफ हा संबंधित विद्यार्थिनीला तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सातत्याने धमकी देत होता. या धमकीच्या बळावर त्याने वेळोवेळी पीडितेचा विनयभंग केला.

​आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधून तिला अधिक व्हिडिओ आणि तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यासाठी दबाव टाकला होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस करत पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली.

​पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हुजेफ पिंजारी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
​

Tags: #videoCrimeJalgaonPolice
Next Post
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add