• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

थर्टी फस्ट साजरा करताय !.. मग ही बातमी तुमच्यासाठी

31 डिसेंबर, 2021 वर्ष अखेर व नुतन वर्षारंभ 2022 मार्गदर्शक सुचना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 31, 2021
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
थर्टी फस्ट साजरा करताय !.. मग ही बातमी तुमच्यासाठी

जळगाव, दि. 30 (जिमाका) – कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई यांच्या आदेशान्वये राज्यात दि. 25 डिसेंबर, 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 % पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% च्या मर्यादत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जुतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांना आरोग्य व स्वच्छेतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे.

वरील सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे आवाहन , जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी एका परिपत्रकानुसार कळविले आहे.

 

Next Post
गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त
जळगाव जिल्हा

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

March 26, 2023
औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण
जळगाव जिल्हा

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

March 25, 2023
आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण
आरोग्य

आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

March 25, 2023
गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

March 25, 2023
कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला
क्रिडा

कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला

March 21, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम

March 21, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.