जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ‘सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो’ या भव्य पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरच्या माध्यमातून इस्रोचा गौरवशाली प्रवास उलगडण्यात आला असून, या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनात इस्रोच्या महत्त्वपूर्ण मोहिमांवर आधारित माहितीपूर्ण पोस्टर्स सादर करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आदित्य L1, चंद्रयान-3, मंगलयान (MOM), रोहिणी RS-1, जीसॅट-14, X-PO-SAT, NVS-01, मेघा-ट्रॉपिक्स मिशन, SLV-3 आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटेलिजन्स सॅटॅलाइट यांसारख्या उपग्रहांची तांत्रिक माहिती आणि त्यांच्या प्रक्षेपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक किशोर ढाके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक प्रा. आर. बी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. दिलीप भारंबे यांनी काम पाहिले. तसेच, इलेक्ट्रोसॉफ्ट कंपनीचे श्री. राजेश ठाकरे व श्री. निलेश वाघ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ‘रोबोट बनवण्याचे तंत्रज्ञान’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या पोस्टर प्रदर्शनात एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
१. अंडरग्रॅज्युएट विभाग (UG):
प्रथम क्रमांक: रेवेश रामेश्वर खराटे
द्वितीय क्रमांक: निंबेश कमाल बारेला
उत्तेजनार्थ: त्रिवेणी हेमंत पाटील, मुनिरा एम. शेख, तडवी तनुजा कसम, दिव्या सचिन पाटील.
२. पोस्ट ग्रॅज्युएट विभाग (PG):
प्रथम क्रमांक: बाविस्कर प्रीती जगजीवन
द्वितीय क्रमांक: पाटील जयेश गुलाबराव
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हर्षल गंगावणे, प्रा. विशाल तेली, प्रा. पानी सर, राम पाटील, राजू सोनवणे आणि राजू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







