जळगाव, दि. 29 – अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन दिनांक 2 जानेवारीला शहरातील लेवा भवनात आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी विवाहोत्सुक युवक-युवतींचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेली परिचय पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश पाटील हे असतील तर प्रमुख अतिथी एकनाथराव खडसे, डॉ. उल्हास पाटील, खासदार श्रीमती. रक्षा खडसे, आ.शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, अँड, रोहिनी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती आशा कोल्हे, ललित कोल्हे, अॅड. प्रकाश व्ही. पाटील, उमेश नेमाडे, प्रदीप भोळे, अॅड. भारती ढाके, औरंगाबाद येथील मधुकर सरोदे, शरद महाजन, पंचायत सदस्य ज्योती महाजन, जागृती चौधरी, डी. डी. चौधरी, राजेश चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांचे सह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील.
संमेलन मेळाव्याचे नियोजनासाठी नुकतीच बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशा कोल्हे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष प्रकाश पाटील व प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकास गठित समित्यांमध्ये व विहित कामे सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजित मेळावा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्वानुमते ठरविण्यात येऊन इतर महत्वाच्या मुद्द्यावर देखील चर्चा करण्यात आली.