• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमधील थरार: पश्चिम बंगाल उपविजेता, तर यजमान महाराष्ट्राची सुवर्णमय कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 20, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलमध्ये पार पडलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या ‘सीआयएससीई नॅशनल स्कूल गेम्स’ अंतर्गत राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या कौशल्याच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या चुरशीच्या स्पर्धेत पश्चिम बंगालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर ‘सीआयएससीई’चा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

​महाराष्ट्राच्या कन्यांची सुवर्ण भरारी..
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ट्रॅडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर अशा तीनही महत्त्वाच्या प्रकारांत सुवर्णपदकांवर नाव कोरले. ट्रॅडिशनल सिंगलमध्ये महाराष्ट्राच्या निरल वाडेकर हिने सुवर्ण यश मिळवले. तसेच रिदमिक पेअरमध्ये तृप्ती डोंगरे हिने सुवर्णपदक पटकावून राज्याचा गौरव वाढवला. आर्टिस्टिक सिंगल प्रकारात मात्र पश्चिम बंगालच्या आनया हुतीत हिने बाजी मारत सुवर्ण पटकावले, तर महाराष्ट्राच्या आर्य सापते हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

​योगामुळे शरीर आणि मन प्रसन्न: डॉ. जोसेफ इमॅनुअल..
पारितोषिक वितरण समारंभात सीआयएससीईचे सचिव डॉ. जोसेफ इमॅनुअल यांनी मार्गदर्शन केले. “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ १५ मिनिटांचा नियमित सराव आपल्याला अनेक व्याधींपासून दूर ठेवू शकतो,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाला अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, प्राचार्य देबासीस दास यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

​प्रामाणिकपणाचे दर्शन: हरवलेले दागिने आणि मोबाईल परत..
स्पर्धेदरम्यान एक कौतुकास्पद घटना घडली. इंदूर येथील प्रोफेसर डॉ. निशा सिद्दिकी यांची दागिने आणि रोकड असलेली पर्स हरवली होती. जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या समीर शेख यांनी अवघ्या दोन तासांत ती शोधून परत केली. तसेच राजस्थान आणि पंजाबच्या खेळाडूंचे हरवलेले मोबाईलही अजित घारगे यांनी सुपूर्द केले. “जळगाव आणि अनुभूतीतून मी अत्यंत सकारात्मक आठवणी घेऊन जात आहे,” अशी भावना डॉ. सिद्दिकी यांनी यावेळी व्यक्त केली.
​


 

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश

जळगावात 'बंधुतेचे तिळगूळ' उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add