• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 20, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी मोठी कारवाई केली. या छाप्यात देहविक्रय करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून, यामध्ये पश्चिम बंगाल आणि सुरत येथील दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंटांना ताब्यात घेतले आहे.

​नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा सापळा..
​संबंधित भागात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध कुंटणखाना सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुरे यांनी पथकासह कारवाईचे नियोजन केले.

​डमी ग्राहक आणि धाडसी कारवाई..
​पोलिसांनी या कुंटणखान्याचे पितळ उघड पाडण्यासाठी एक डमी ग्राहक तयार केला. त्या ग्राहकाला १५०० रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. व्यवहाराची खात्री पटल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी घरावर छापा टाकला.

​या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे,
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह ​आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतनहरी गीते, रवींद्र मोतीराया आणि महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

​महिलांची सुटका, आरोपी ताब्यात..
​छाप्यादरम्यान पोलिसांना तिथे चार महिला मिळून आल्या. यात एक महिला पश्चिम बंगालची, एक सुरतची तर दोन स्थानिक महिला होत्या. पोलिसांनी या सर्वांची सुटका केली आहे. कारवाई सुरू असताना तिथून एक ग्राहक पळून जाण्यात यशस्वी झाला. ​याप्रकरणी कुंटणखाना चालविणारी महिला आणि दोन मध्यस्थ (एजंट) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add