• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

गाडीवरील हल्ल्याप्रकरणी कायदेशीर लढा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 18, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जनतेने आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर विश्वास ठेवून आम्हाला कौल दिला आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता, येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले.

​शनिवारी (दि. १७) रोजी विष्णू भंगाळे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप आणि विविध वादांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

​आरोपांना कामातून उत्तर देणार..
​निवडणुकीच्या काळात माझ्यावर झालेल्या विविध आरोपांबाबत बोलताना भंगाळे म्हणाले की, “माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रतिआरोपांनी उत्तर देणार नाही. जनतेने दिलेला कौल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. भविष्यात विकासाची कामे करूनच मी सर्व आरोपांना उत्तर देईन.”

​वाहनाची तोडफोड, गुन्हा दाखल
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या वाहनावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करून मागील काच फोडून नुकसान करण्यात आले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार नगरात राहणारे भंगाळे यांच्या घराशेजारी असलेल्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे कार (क्र. एमएच ३९, एबी ९९९९) उभी करण्यात आली होती. गणेश भानुदास भोळे (रा.श्रद्धा कॉलनी) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 

​मतदाराला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी मोठा राडा झाला. बोगस मतदान करीत असल्याच्या संशयावरून अपक्ष उमेदवार ॲड.पीयूष नरेंद्र पाटील यांनी एका मतदाराला मतदान केंद्राबाहेर ओढून आणत कमरेत लाथ घालून मारहाण केली. फिर्यादी सुनील श्रीधर भंगाळे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव) यांना मारहाण करण्यात आली होती. या राड्यामुळे सुनील भंगाळे आणि त्यांचे सहकारी पराग लक्ष्मण पाटील हे मतदानापासून वंचित राहिले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #elections#jalgaon_city#municipalcorporation#political#vishnubhangale
Next Post
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

जळगावात २३ जानेवारीपासून 'बहिणाबाई महोत्सवा'चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add