• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

​जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बहिणाबाई महोत्सव’ यंदा आपले ११ वे वर्ष साजरे करत आहे. येत्या २३ ते २७ जानेवारी दरम्यान जळगाव नगरीत या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव ‘पंच परिवर्तन’ या विशेष संकल्पनेवर (थीम) आधारित असेल.

​महोत्सवाचे उद्घाटन आणि विशेष सन्मान
​महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात समाजसेवेतील योगदानाबद्दल पुखराज पगारिया आणि निळकंठ गायकवाड यांना मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

​प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आणि स्टॉल्स
​बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लघु उद्योजकांच्या स्टार्टअपला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महोत्सवात एकूण २८० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने खवय्यांसाठी खान्देशी पदार्थांची खास मेजवानी उपलब्ध होणार आहे. ​तसेच स्थानिक उद्योजकांच्या कल्पक उत्पादनांचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यंदा रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित संस्था ‘क्रेडाई’चा एक्स्पो देखील या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

​सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..
​महोत्सवात केवळ व्यवसायच नव्हे, तर मनोरंजनाचाही धमाका असेल. यामध्ये ​पारंपारिक पोवाडा गायन, ​फॅशन शो, ​विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील सादरीकरण होणार आहे.

दरम्यान ​या महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी, विनोद ढगे, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सराफ, तुषार महाजन, राजेश खडके, पुष्कर नेहेते आदी मान्यवर उपस्थित होते.

​खान्देशी संस्कृतीचे जतन आणि स्थानिक रोजगाराला चालना देणाऱ्या या महोत्सवात जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_city#sagarpark#बहिणाबाईमहोत्सव
Next Post
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

एसटी प्रशासनाचा 'रामभरोसे' कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group