जळगाव, दि. 27 – शहरातील गणपती नगरात असलेल्या एका कॅफेवर पोलीस विभागाने नुकतीच छापा टाकत कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईचे वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यानंतर वृत्तवाहिनीचे संपादक आनंद शर्मा यांना अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन करत बातमीचा व्हिडिओ यूट्यूब चैनल वरून डिलीट करण्याचे सांगण्यात आले, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी देण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. प्रविण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
तसेच संबंधित दोघं अनोळखी मोबाईल नंबर पोलीस विभागाला देत, सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. अशी विनंती पोलीस अधीक्षक श्री. मुंढे यांना निवेदनातून करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्यासह कमलेश देवरे, अयाज मोहसिन, विजय पाटील, रजनीकांत पाटील, जितेंद्र कोतवाल, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, जकी अहमद, भूषण हंसकर आदी उपस्थित होते.