• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव मनपा महायुतीची चर्चा फिस्कटली; भाजप ७५ जागांवर स्वबळावर लढणार?

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी बाहेर तर मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 28, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव मनपा महायुतीची चर्चा फिस्कटली; भाजप ७५ जागांवर स्वबळावर लढणार?

​पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी बाहेर तर मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला असून, आज (दि.२८) रविवारी झालेल्या बैठकीत महायुतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. भारतीय जनता पक्षाने आता ७५ जागांवर ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.

​अजिंठा विश्रामगृहात रंगले नाट्य..
​रविवारी सकाळी १० वाजेपासून अजिंठा विश्रामगृह येथे महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, जागांच्या आकड्यावरून सुरू झालेली चर्चा वादात रूपांतरित झाली.

​२५ जागांचा आकडा ठरला कळीचा मुद्दा..
​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने (शिंदे गट) त्यांच्याकडे असलेल्या विद्यमान २५ “विनिंग सीट्स” (निवडून येण्यायोग्य जागा) लक्षात घेता २५ जागांची आग्रही मागणी केली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नसल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला. आपल्याला अपेक्षित जागा मिळत नसल्याचे पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी उठून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे.

​या राजकीय घडामोडींनंतर आता जळगाव महापालिकेत ‘त्रिशंकू’ लढत होणार की भाजप एकहाती सत्ता मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या ‘स्वबळ’ भूमिकेमुळे मित्रपक्ष आता कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिकृत घोषणा सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

Tags: #elections#girishmahajan#gulabraopatil#jalgaon_city#municipalcorporationBjpShivsena
Next Post
नव्या वर्षाचे स्वागत ‘मैत्र महोत्सवाने’; १ जानेवारीपासून जळगावात सांस्कृतिक मेजवानी

नव्या वर्षाचे स्वागत 'मैत्र महोत्सवाने'; १ जानेवारीपासून जळगावात सांस्कृतिक मेजवानी

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add