• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नव्या वर्षाचे स्वागत ‘मैत्र महोत्सवाने’; १ जानेवारीपासून जळगावात सांस्कृतिक मेजवानी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
नव्या वर्षाचे स्वागत ‘मैत्र महोत्सवाने’; १ जानेवारीपासून जळगावात सांस्कृतिक मेजवानी

​जळगाव, (प्रतिनिधी) : नव्या वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यासाठी आणि कला-संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी जळगावात ‘परिवर्तन मैत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन व ‘परिवर्तन’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दि. १ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत भाऊंच्या उद्यानातील एमफी थिएटरमध्ये रंगणार आहे.

​स्वर्गीय भवरलाल जैन आणि स्वर्गीय ना. धो. महानोर यांच्याशी असलेले ‘परिवर्तन’चे जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे नाते अधोरेखित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून नृत्य, नाट्य, संगीत आणि चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

​महोत्सवाचे उद्घाटन १ जानेवारीला होईल. त्यानंतर सलग आठ दिवस दररोज सायंकाळी ६:३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. यामध्ये जळगावच्या स्थानिक कलावंतांसह पुणे, कोकण, भुसावळ आणि शिरपूर येथील नामवंत कलावंतांचे नाट्य अविष्कार आणि सादरीकरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.

​या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रेखा महाजन, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, इंजि. प्रकाश पाटील, नंदू अडवाणी, स्वरूप लुंकड, विनोद पाटील, पारस राका आणि मानसी गगडाणी हे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ‘परिवर्तन’चे अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबिराज राणे आणि नारायण बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमाला जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

​महोत्सवाच्या तयारीसाठी मंजुषा भिडे, पुरुषोत्तम चौधरी, राजू बाविस्कर, हर्षल पाटील, होरीलसिंह राजपूत यांच्यासह परिवर्तनची संपूर्ण टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे. जळगावकर रसिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

​

Tags: Jalgaon
Next Post
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा ४ जानेवारीला जळगाव दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा ४ जानेवारीला जळगाव दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add