• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आरटीओ सेवांच्या नावाखाली बनावट वेबसाइट, ॲप्स आणि लिंकपासून सावधान.. – आरटीओ अधिकारी यांचे आवाहन

फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
आरटीओ सेवांच्या नावाखाली बनावट वेबसाइट, ॲप्स आणि लिंकपासून सावधान.. – आरटीओ अधिकारी यांचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी तसेच ई-चलनाशी संबंधित विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्याचा फायदा घेत काही फसवणूक करणारे बनावट वेबसाइट्स, बनावट मोबाईल ॲप्स (APKs), आणि संशयास्पद लिंकद्वारे नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाढत्या प्रकाराबाबत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे. वाहन चालविण्याचा परवाना (DL) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे. RTO Services.apk, “mParivahan_Update.apk, eChallan_Pay.apk अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे. अशा प्रकारे फसवणूक करणारे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात.

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, अनधिकृत लिंक आणि फर्जी APK ॲप्सद्वारे OTP, बँक माहिती व मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये असे परिवहन विभागाने स्पष्ट केले. RTO कार्यालय अथवा परिवहन विभाग कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठवत नाही.

नागरिकांनी केवळ gov.in ने समाप्त होणारे अधिकृत संकेतस्थळ ज्यात वाहन नोंदणी (VAHAN) : vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) : sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा : parivahan.gov.in, ई-चलन पोर्टल : echallan.parivahan.gov.in यांचा वापर करावा. तसेच com, online, site, in अशा डोमेनवरील कोणतेही संकेतस्थळ उघडू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.

संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास National Cyber Crime Portal ( https://www.cybercrime.gov.in ), सायबर फसवणूक हेल्पलाईन १९३० किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-२०२५’ उत्साहात

अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-२०२५’ उत्साहात

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group