• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

​जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्यानगर परिसरातून ‘धूम’ स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून नेली. मात्र, हा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण ही पोत सोन्याची नसून ती अवघ्या काही रुपयांची बेन्टेक्स (कृत्रिम दागिना) असल्याने महिलेने पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. या चोरीच्या घटनेतील रेकॉर्डवरील दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.


​​ही घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अयोध्यानगरमध्ये घडली. स्वाती अनिल इंगळे (रा. अयोध्यानगर) या त्यांच्या घरासमोर दुचाकी लावून गेट उघडत होत्या. याच संधीचा फायदा घेत, मागाहून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने क्षणात महिलेच्या गळ्यातील पोत ओढली आणि दोघांनीही तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.


​सीसीटीव्हीत चोरटे कैद..
​पोत चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ महिलेशी संवाद साधला असता, त्यांनी चोरीला गेलेला दागिना बेन्टेक्सचा (नकली) असल्याचे स्पष्ट केले आणि त्यामुळे तक्रार दाखल करण्यास नकार दिला. ​तरीही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोत चोरी करणारे ते दोन्ही चोरटे कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत.

फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची ओळख पटली आहे. पोत नकली असल्याने आर्थिक नुकसान टळले असले तरी, शहरात चोरट्यांची सक्रियता पाहता, एमआयडीसी पोलीस आता या रेकॉर्डवरील आरोपींचा कसून शोध घेत आहेत.


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!

धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय 'कर्मवीर चक्र' पुरस्कार!

ताज्या बातम्या

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड
क्रिडा

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड

October 29, 2026
जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’
क्रिडा

जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’

October 29, 2026
मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!
आरोग्य

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

October 29, 2026
भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल
गुन्हे

भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

October 29, 2026
निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य

निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

October 29, 2026
दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई
खान्देश

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई

October 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add