• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५; उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक.. – जिल्हाधिकारी रोहन घुगे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५; उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक.. – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, सावदा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, रावेर, एरंडोल, फैजपूर या १६ नगरपरिषदांच्या मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायत तिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना यानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीत जिल्हाधिकारी श्री. घुगे हे अध्यक्ष आहेत. याशिवाय या समितीत पोलिस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती इमारत पहिला मजला, आकाशवाणी चौक, जळगाव) यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरात निर्मिती खर्चाचे देयक, जाहिरातीचा पेन ड्राईव्ह / सीडी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती सोबत जोडाव्यात, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी केले आहे.


 

Next Post
रोटरीतर्फे ‘प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी’ शिबिर; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

रोटरीतर्फे 'प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी' शिबिर; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add