• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाब्दिक वाद; मारहाण करून तरुणाला रेल्वे रुळावर फेकले, एकाला अटक!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शाब्दिक वाद; मारहाण करून तरुणाला रेल्वे रुळावर फेकले, एकाला अटक!

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर) या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. हॉटेलमध्ये जेवण करताना झालेल्या वादातून तिघांनी त्याला मारहाण करून रेल्वे रुळावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हॉटेलमध्ये ‘चोर पऱ्या’ बोलण्यावरून वाद..
सोमवारी जळगाव ते भादली मार्गावर रेल्वे रुळाजवळ हर्षल भावसार याचा मृतदेह आढळून आला होता. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले असता, हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे उघड झाले.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये बसल्यानंतर हर्षलने परेश संजय महाजन याला ‘चोर पऱ्या’ बोलल्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. त्यानंतर परेशचा भाऊ भूषण संजय महाजन (वय ३१, रा. ज्ञानदेव नगर) आणि लोकेश मुकुंदा महाजन यांनी हर्षलला हॉटेलमध्ये मारहाण केली. मारहाणीनंतर हर्षल तिथून निघून गेला.

दुचाकीवरून नेऊन रेल्वे रुळावर फेकले..
मारहाण करणाऱ्या आरोपींनी, परेश महाजनसह, हर्षलचा पाठलाग करत त्याला का.ऊ. कोल्हे शाळेजवळ पकडले. तिथून त्याला दुचाकीवर बसवून असोदा शिवारातील एका शेतात नेण्यात आले. तिथे पुन्हा मारहाण करून त्याला रेल्वे रुळावर फेकून देण्यात आले. याच वेळी रेल्वेची धडक लागून हर्षलचा मृत्यू झाल्याची फिर्याद मयताच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे.

एका संशयिताला अटक..
पोलिसांनी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करत भूषण महाजन याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने हर्षलला मारहाण केल्यानंतर रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. इतर दोन आरोपी- परेश संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
शासकीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन कमी! वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी ‘जीएमसी’मध्ये प्रक्रिया सुरु

शासकीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन कमी! वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी 'जीएमसी'मध्ये प्रक्रिया सुरु

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add