• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मालेगावमधील चार वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणी राज्यात संताप

आरोपीस फाशीसाठी जळगावातून मुख्यमंत्र्यांना निवेदन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 18, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
मालेगावमधील चार वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणी राज्यात संताप

जळगाव, (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात ४ वर्षांच्या निरागस चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण खून प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या भयावह घटनेमुळे सुवर्णकार समाजासह सर्वच समाजघटकांमध्ये तीव्र अस्वस्थता असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी एकमुखी मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. हे प्रकरण विलंब न लावता फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवावे. यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून ‘निरपराध बालिकेचे जीवन हिरावून नेणारा नराधम समाजात राहण्यास पात्र नाही. न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही.’ असा इशारा देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय बी. विसपुते, संत शिरोमणी नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूणचे रमेश डी. सोनार, सुवर्णकार कारागीर संघ, अहीर सुवर्णकार महिला मंडळ, हितकारी सभा, खान्देश विभाग, आणि ऋणानुबंध वधू-वर पालक परिचय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांनी एकत्र येत या प्रकरणाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर आणि तात्काळ शिक्षेची ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Next Post
शाब्दिक वाद; मारहाण करून तरुणाला रेल्वे रुळावर फेकले, एकाला अटक!

शाब्दिक वाद; मारहाण करून तरुणाला रेल्वे रुळावर फेकले, एकाला अटक!

ताज्या बातम्या

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group