• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

२५ किलो गांजासह एक आरोपी जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची रावेरमध्ये मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
२५ किलो गांजासह एक आरोपी जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची रावेरमध्ये मोठी कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग येथे एका आरोपीला २५ किलो गांजासह अटक केली आहे. जप्त गांजाची किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, सहस्त्रलिंग येथील एका शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आली आहे.

या माहितीच्या आधारे पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खात्री करून संबंधित शेतावर छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी महेरबान रहेमान तडवी (वय-३२, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) याच्या शेतात २५ किलो वजनाचा कँनाबीस (गांजा) लागवड केलेला आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउपनिरी सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी तसेच रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मनोज महाजन, रावेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Tags: CrimePoliceRaver
Next Post
रोहन घुगे यांनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

रोहन घुगे यांनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add