भडगाव, दि.19 – कजगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची तालुका स्थरीय बैठक विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बैठकीत आगामी पत्रकार दिना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच भडगाव तालुका भडगाव शहर व कजगाव शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष पदी विलास पाटील, उपाध्यक्ष अमीन शाह, सचिव दिपक अमृतकर, संघटक आनंदा महाजन, सहसंघटक अमित देशमुख, सल्लागार डॉ बी बी भोसले, भडगाव शहर अध्यक्षपदी निलेश महाले, उपाध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी, सचिव चेतन पवार, संघटक सुभाष ठाकरे तर कजगाव शहर अध्यक्षपदी अमीन पिंजारी, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव संजय कोळी यांची निवड करण्यात आली.
सदरील बैठक जेष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संजय कोतकर, माजी तालुका अध्यक्ष नितीन सोनार, संजय महाजन, मनीष सोनवणे, कैलास महाजन, निलेश पाटील, गोपाल भोई, सुभाष पवार आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.