• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

बैठकीत एकमताने निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

जळगाव (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली आहे. यात शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी विश्वजीत चौधरी यांची निवड झाली. तर प्रधान सचिवपदी हेमंत प्रल्हाद सोनवणे याची फेरनिवड करण्यात आली आहे.

जळगाव शहर शाखेची बैठक नुकतीच जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्याचे पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे तर निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला विविध उपक्रम घेण्याविषयी चर्चा झाली. यात राष्ट्रीय विज्ञान दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उपक्रम घेण्याविषयी प्राथमिक नियोजन करण्यात आले.

यानंतर कार्यकारिणीची एकमताने निवड झाली. यावेळी प्रा. कट्यारे यांनी, मिनाक्षी चौधरी यांचे शाखा कार्याध्यक्ष म्हणून नाव सुचविले. त्यानुसार, मानसिक आरोग्य व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे जिल्हा कार्यवाह मीनाक्षी चौधरी यांनी संघटनेच्या “एक व्यक्ती, एक पद” धोरणानुसार जिल्ह्याचे पद सोडून शहर शाखेचे कार्याध्यक्षपद सर्वानुमते स्विकारले. याशिवाय अध्यक्षपदी यशवंत बारी, उपाध्यक्ष म्हणून अजित चौधरी, प्रधान सचिव म्हणून हेमंत सोनवणे याची फेरनिवड झाली.

याशिवाय इतर कार्यकारिणीत वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प म्हणून आनंद ढिवरे, युवा सहभाग कार्यवाह गुरुप्रसाद पाटील, महिला सहभाग कार्यवाह प्रा. डॉ. कल्पना दिलीप भारंबे तर बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह म्हणून जितेंद्र बाबुलाल धनगर यांची निवड झाली. बैठकीला ऍड. भरत गुजर, अजय जाधव, विलासराव देशमुख, प्रमोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add