जळगाव, दि. 20 – राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गाडगेबाबा उद्यानात असलेल्या गाडगे महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी बोलताना गाडगेबाबा यांच्या सामाजिक, प्रबोधनात्मक कार्याला उजाळा दिला.
यावेळी अरुण शिरसाळे, नरेंद्र जाधव, सुरेश ठाकरे, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, श्याम वाघ, दीपक बाविस्कर, भास्कर वाघ, ईश्वर मोरे, दिनकर सोनवणे, प्रशांत मांडोळे, रघुनाथ भदाणे, सर्जेराव बेडीस्कर, राकेश वाघ, दिलीप शेवाळे, राजेश जाधव, धनंजय सोनवणे, विजय शेवाळे, भास्कर महाले, राजेंद्र सोनवणे, भागवत शेवाळे, रवी बोरसे आधीच समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.