• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संतापजनक! गाणे बंद केल्याच्या रागातून बापाने मुलीला कुकरच्या झाकणाने, पत्नीला काचेच्या ग्लासाने मारहाण

दोघी जखमी; चंदूअण्णा नगर परिसरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 17, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
संतापजनक! गाणे बंद केल्याच्या रागातून बापाने मुलीला कुकरच्या झाकणाने, पत्नीला काचेच्या ग्लासाने मारहाण

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील चंदूअण्णा नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला कुकरच्या झाकणाने मारहाण केली, तर पत्नीला काचेचा ग्लास फोडून जखमी केले. ही घटना शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली असून, या प्रकरणी आरोपी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणी लावली. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील अभ्यास करत होती. तिने वडिलांना गाणे बंद करण्याची विनंती केली, पण ते ऐकत नसल्याने तिने स्वतःच मोबाईलवरील गाणे बंद केले. याच क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या समाधानने पत्नी जागृती पाटील हिला काचेचा ग्लास फोडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

आईला मारहाण होत असताना मुलगी प्राप्ती तिला वाचवण्यासाठी मध्ये आली. तेव्हा पित्याने कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारून तिला जखमी केले. या घटनेनंतर आरोपी समाधान पाटील हा आपल्या मूळ गावी कल्याणेहोळ येथे पळून गेला आहे. तिथे त्याने आपल्या आई-वडिलांकडे “या दोघींचा खून करणार” असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी जागृती पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी समाधान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
मतदारसंघातील दोन हजार भाविक अयोध्या-काशी यात्रेला रवाना; आ. सुरेश भोळे यांनी केले मोफत रेल्वेचे आयोजन

मतदारसंघातील दोन हजार भाविक अयोध्या-काशी यात्रेला रवाना; आ. सुरेश भोळे यांनी केले मोफत रेल्वेचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add