• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ‘चेस इन स्कूल’ उपक्रमावर विशेष भर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 5, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ‘चेस इन स्कूल’ उपक्रमावर विशेष भर

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जैन हिल्सच्या परिश्रम हॉल येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या प्रमूख उपस्थित पार पडली.

महाराष्ट्रातून जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी त्यात सहभाग घेतला. चेस इन स्कूलसह विविध दहा विषयांवर सर्वांच्या चर्चेअंती मंजूरी देण्यात आली.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सर्व साधारण सभेत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. उपाध्यक्ष फारूख शेख (जळगाव), निनांत पेडेनेकर (पालघर), सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा), पुरुषोत्तम भिलारे (मुंबई) यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा असोसिएशनचे दोन पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २८ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांचे वाचन करण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या खात्यांची पुष्टी करुन मंजूर करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करुन त्यांचे मानधन निश्चित केले गेले. २०२४-२५ चा वार्षिक अहवाल मंजूर केला गेला. चेस इन स्कूल अंतर्गत शाळेत बुद्धिबळ कार्यक्रमाबद्दल विशेष चर्चा करण्यात आली. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी चेस इन स्कूल चे सुरु असलेले कार्यक्षेत्र वाढविण्यावर चर्चा केली. चेस इन स्कूलसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेमिनार घेण्यात यावे, पुढील तीन वर्षात चेस इन स्कूल उपक्रमाची व्याप्ती कशी वाढेल यावरही त्यांनी भाष्य केले. त्यासाठी विशेष वेब साईड सुरू करुन चेस इन स्कूल हा उपक्रम राबविली जाणार असल्याचे अतुल जैन म्हणाले.

महाराष्ट्र आर्बिटर कमिशनने नियुक्त केलेल्या चिफ व डेप्युटी आर्बिटरच्या मानधनात वाढ करण्याबाबत आर्बिटर कमिशनचे अध्यक्ष पी. बी. भिलारे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आर्बिटर यांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. आर्थिक नियमांमधील बदलांवरसुद्धा चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. स्पोर्टस पॉलिसी व कोड यावर चर्चा करण्यात आली.

वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोपावेळी अशोक जैन यांनी सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले. त्यात ते म्हणाले, महाराष्ट्रात आधी दोन ग्रॅण्डमास्टर होते आता जवळपास १४ झाले हे यश विद्यार्थ्यांचे प्रज्ञेचे असून त्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सुरु असलेल्या विविध उपक्रमाचे सुद्धा आहे. अजूनही २४ जिल्ह्यांमध्ये आपले कार्य सुरु असून ते अधिक सक्रिय पद्धतीने वाढविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. निरंजन गोडबोले यांनी समन्वय साधला.


 

Tags: #sports
Next Post
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अखेर निलंबित

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अखेर निलंबित

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group