• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कंपनीत विषारी रसायनमुळे २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कुसुंबा गावावर शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
कंपनीत विषारी रसायनमुळे २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कुसुंबा गावावर शोककळा

जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत विषारी रसायनाच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे कुसुंबा गावावर आणि सोनवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सोनवणे हा २७ जून रोजी एमआयडीसीतील एका कंपनीत कामावर असताना, तो अचानक एका घातक व विषारी द्रव्याच्या (केमिकल) संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, १ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार सचिन पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कंपनीतील सुरक्षा उपाययोजना आणि या घटनेचे नेमके कारण याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात वाचन चळवळ हा उपक्रम सुरू

संत ज्ञानेश्वर विद्यालयात वाचन चळवळ हा उपक्रम सुरू

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add