• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 20, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

धरणगाव, (जिमाका वृत्तसेवा) : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.

या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

“धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली.

नवीन पोलीस ठाण्यांची मागणी..
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने त्याठिकाणी ५० शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

Next Post
हृदयद्रावक! रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; विल्हाळे गावात शोककळा

हृदयद्रावक! रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; विल्हाळे गावात शोककळा

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group