• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हृदयद्रावक! रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; विल्हाळे गावात शोककळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
हृदयद्रावक! रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; विल्हाळे गावात शोककळा

भुसावळ, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे शेतात मशागत करत असताना रोटर मशीनमध्ये अडकून एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (१९ जून) दुपारी साडेतीन वाजता घडली. या घटनेने संपूर्ण विल्हाळे गावावर शोककळा पसरली आहे.

कचरू उघडू सुरवाडे (वय ७०) असे या दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कचरू सुरवाडे यांनी बटाईने घेतलेल्या शेतात ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटरच्या साहाय्याने मशागतीचे काम सुरू केले होते. काम करत असताना त्यांचा अचानक ट्रॅक्टरवरील तोल गेला आणि ते खाली पडले. दुर्दैवाने, ते थेट रोटर मशीनमध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचे हात आणि पाय रोटरमध्ये सापडून गंभीररित्या कापले गेले आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. कचरू सुरवाडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Next Post
शालकाने चक्क मेव्हण्यालाच लुबाडले; ३ कोटींची केली फसवणूक..!

शालकाने चक्क मेव्हण्यालाच लुबाडले; ३ कोटींची केली फसवणूक..!

ताज्या बातम्या

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

June 27, 2026
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात
क्रिडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
शैक्षणिक

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

June 27, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group