• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळल्याने रियानीबाई शांतीलाल बारेला (वय-३५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती, दोन मुले आणि भावाचा मुलगा असे चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले बारेला कुटुंब गेल्या १० वर्षांपासून पळासखेडा मीराचे येथील प्रकाश बाबुराव विचारे यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली झोपडी करून राहत होते आणि शेतीचे काम करत होते. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या झोपडीजवळ असलेले चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळले.

यावेळी झोपडीत आश्रय घेतलेल्या रियानीबाई बारेला, त्यांचे पती शांतीलाल बारेला (वय-४०), मुलगा संजय शांतीलाल बारेला (वय-१५), मुलगा संदीप शांतीलाल बारेला (वय-२०) आणि भावाचा मुलगा दयाराम धरमसिंग बारेला (वय-२०) हे सर्वजण झाडाखाली दबले गेले. या दुर्घटनेत रियानीबाई झाडाखाली दबून जागीच मरण पावल्या, तर त्यांचे पती, दोन्ही मुले आणि भावाचा मुलगा असे चौघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रियानीबाईंच्या नातेवाईकांनी रुग्णालयात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, बारेला कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Next Post
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add