चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे बहाळ, टेकवाडे, रहिपुरी, वडगाव लांबे परिसरातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या नुकसानीमुळे तातडीने शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.