• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुर्दैवी! क्रिकेट सामना पाहून परतणाऱ्या बोदवडच्या २ खेळाडूंचा अपघाती मृत्यू, ११ जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुर्दैवी! क्रिकेट सामना पाहून परतणाऱ्या बोदवडच्या २ खेळाडूंचा अपघाती मृत्यू, ११ जखमी

बोदवड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला. ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर वाहन क्रमांक (एमएच २० डीजे ४८३४) ने बोदवडकडे परतत होते. आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर वाहनाला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामखी दरवाजा, बोदवड) याचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेले अन्य ११ जखमी खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Next Post
धक्कादायक: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह, झाली गर्भवती; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह, झाली गर्भवती; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add